पुणे : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी लगबग सुरू आहे. अनेक ठिकाणी पक्षाकडून डावलले जाण्याची शक्यता असल्याने नेत्यांनी इतर पक्षांमध्ये चाचपणी करण्यास सुरुवात केली. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचं पुढे आलं आहे. विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जात असताना, आता पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्या कमल व्यवहारे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यास आपण लढण्यावर ठाम असल्यास व्यवहारे यांनी सांगितलं आहे.
कसब्यातून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांनी आज पुण्यात संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भेटीनंतर बोलताना व्यवहारे म्हणाल्या “संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आमच्या पक्षाचे खासदार, तर संभाजीराजे आणि आम्ही एकाच संस्थेत काम करतो त्यासंदर्भात ही भेट होती. मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून सध्या तरी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. 40 वर्षांपासून मी काँग्रेसची सदस्य असून यंदा परिवर्तन करणार आणि निवडणूक लढवणारच”, असे म्हणत व्यवहारे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात कमल व्यवहारे यांचं संघटन चांगलं आहे. त्यामुळे आता व्यवहारे यांच्या निर्धाराने रवींद्र धंगेकर यांचे टेन्शन वाढणार आहे. धंगेकरांनी कसब्यातून पोटनिवडणूक त्यानंतर नुकतीच झालेली लोकसभा आणि लोकसभेला मिळालेल्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र कमल व्यवहारे या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?
-राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!
-Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?
-मावळात राजकारण पेटलं! ‘आमच्यात फूट पाडणाऱ्यांचा…’ सुनील शेळकेंनी दिला इशारा
-अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’