पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी वरिष्ठांकडून आणि उमेदवारांकडून प्रयत्न करण्याची शेवटची संधी आहे. अशातच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून तसेच उमेदवरांकडून दबाव टाकला जावू शकतो म्हणून काही बंडखोर नॉटरिचेबल आहेत.
पुण्यातील कसबा मतदारसंघात असेच चित्र पहायला मिळत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे यांनी त्यांच्याशी भेट घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमल व्यवहारे यांनी आपला फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे.
पुण्यात सर्वाधिक बंडखोरी ही काँग्रेस पक्षात पहायला मिळत आहे. कसबा, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस हे अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरु आहेत. बंडखोरांचे बंड थंड करण्यात वरिष्ठांना प्रयत्नांना यश आलेले नाही. येत्या काही तासात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ आबा बागुलांच्या समर्थनार्थ मतदारसंघात बॅनरबाजी
-नाना काटेंचं बंड शमवण्यासाठी अजित पवारांकडून शर्तीचे प्रयत्न; नाना काटे माघार घेणार का?
-“…त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”; विजय शिवतारेंचा अजितदादांना सवाल
-लोकसभेला रान उठवलं, पण आता अजितदादा घेणार बदला? पुरंदरच्या मैदानात शिवतारेंविरोधात उतरवला उमेदवार
-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली परंपरा; आबा बागुलांकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान