पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यातील हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठा राजकीय राडा पहायला मिळत आहे. हडपसरमध्ये विद्यमान आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त असल्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेमध्ये नाराजी पहायला मिळाली आहे. हडपसरमधून शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे हे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने भानगिरे हे कमालीचे नाराज आहेत.
एकीकडे महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने शिंदे सेनेच्या नाराजीचा फटका बसणार आहे. नाना भानगिरे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. आता एकनाथ शिंदे भानगिरेंची नाराजी दूर करणार की हडपसरमधील शिवसैनिकांच्या साथीने अपक्ष निवडणूक लढवणार? हे स्पष्ट होणार आहे.
हडपसरमधील महाविकास आघाडीची परिस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली. हडपसरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असल्याने महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे या मतदारसंघ गेला आहे. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीकडूनही या मतदारसंघावर ठाकरे सेनेकडून दावा करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार) कडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे सेनेकडून देखील चांगलीच नाराजी पहायला मिळाली.
हडपसरमधून शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना तिकीट मिळण्याची आशा असतानाच प्रशांत जगताप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे महादेव बाबर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. थेट बंंडाचं निशाण फडकवत बाबर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
एकाच मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. हडपसरमध्ये ठाकरेंचे महादेव बाबर आणि शिंदेचे नाना भानगिरे हे दोघेही मैदानात उतरणार असणार आहेत. एकंदरीतच भानगिरे आणि बाबर यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे हडपसरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत आणि दोन्ही शिवसेनेत लढत पहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील हडपसरमधून साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघात राजकीय खिचडी शिजत असल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ठाकरेसेनेला दुय्यम स्थान, निष्ठावंतांमध्ये नाराजीची लाट; हडपसर अन् कसब्यात बसणार फटका
-चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक
-विधानसभा निवडणूक: मावळमध्ये १७ लाखांची रोकड जप्त; इतका पैसा येतोय कुठून?
-बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ‘𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान’, अभंग Repost’चे आयोजन
-अमित शहा याला दारात तरी उभं करतील का?; भरणेंच्या प्रचारसभेतून अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा