पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची तयारी सुरु असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीकडून पुण्यातील ८ मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या तब्बल ४१ एवढी आहे. अशात आता महायुतीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे.
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २५ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची चर्चा रंगत आहे. या २५ जणांच्या यादीमध्ये पुणे शहरातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आहे. पण हडपसरमधील चेतन तुपे यांचे नाव मात्र उमेदवार यादीत नाही. त्यामुळे चेतन तुपेंचा उमेदवारीतून पत्ता कट होणार का? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले शिंदेंच्या शिवेसना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उमेदवारीचा रस्ता मोकळा झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे आता आमदार चेतन तुपे आणि नाना भानगिरे यांच्याबाबत जागावाटपात काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस
-गणेश विसर्जनादिवशी शहरातील ‘हे’ १७ मुख्य रस्ते असणार बंद; कोणत्या रस्त्यावर पार्किंग मनाई?
-ठाकरेंचा पुण्यातील ३ मतदारसंघांवर दावा? जागा वाटपात होणार जोरदार खडाखडी
-पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती