पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज बाणेरमध्ये बालेवाडीमधील ग्रामदैवतांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून चंद्रकांत पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कोथरुडमधून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रविवारी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आज सोमवारी पाषाणमधील मारुती, भैरवनाथ, बाणेरमधील भैरवनाथ मंदिर आणि सोमेश्वर वाडीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली.
‘मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि गेल्या पाच वर्षांत कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी दिली. तसेच पक्षाने पुन्हा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन कोथरुडकरांच्या सेवेची संधी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत’, अशा भावना चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केल्या आहेत.
“लोकसभा निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम करावे”, असे आवाहन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
‘लोकसभा निवडणुकीत बाणेर बालेवाडीकरांनी मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही चंद्रकांत पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असा भैरवनाथाच्या साक्षीने शब्द देतो’, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांनी व्यक्त केली आहे.
भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस सचिन दळवी,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता करंदीकर,राहुल कोकाटे,मोरेश्वर बालवडकर,अनिकेत मुरकुटे, शिवम सुतार, राजेंद्र पाषाणकर,प्रवीण शिंदे, उत्तम जाधव, विवेक मेथा,रोहन कोकाटे, सचिन सुतार, सुभाष भोळ, सचिन सुतार,सुशील सरकते,कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, वैशाली कमासदार, पुनम विधाते, भगवानतात्या निम्हण,ज्ञानेश्वर पारखे,पोपटराव जाधव, तानाजी काकडे, , काशिनाथ दळवी,यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: बागवे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत? व्हिडीओ शेअर करत थेट सांगितलं…
-अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?
-Assembly Election: अजितदादांचं ठरलं! येत्या २८ तारखेला कन्हेरीत फुटणार प्रचाराचा नारळ
-भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर
-वडगाव शेरी भाजपकडे जाणार? सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली, देवगिरीवर घेतली अजितदादांची भेट