पुणे : लोकसभा निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक पार पडली आता सर्व राजकीय नेते उत्सुक आहेत ते विधानसभा निवडणुकीसाठी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्वातील संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या ‘संवाद यात्रे’च्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
येत्या २१ जुलै रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील ५ हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख पक्की ठरणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले आहे. पुण्यात होणाऱ्या अधिवेशनात अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील भाजपचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि नगरपालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
‘आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. चुकून महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे’, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी
-कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर भाजी विकून मुलाला शिकवलं अन् लेकानंही आईच्या कष्टाचं पांग फेडलं
-वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता वारकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; राज्य सरकारची मोठी घोषणा
-अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!
-महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना