मुंबई | पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मंगळवारी दुपारी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजताच महायुतीला मोठी धक्का बसणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महायुतीतील मित्रपक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष आता महायुतीतून बाहेर पडणार असून या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरुन नाराज असलेल्या जानकरांनी आज मोठी घोषणा करत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीत विधानसभा निवडणुकीसाठी ४०-५० जागांची मागणी केली होती. मात्र, जानकरांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जानकरांनी आत्ताची लोकसभा निवडणूक महायुतीकडून लढवली. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला. आता विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. मात्र त्यांना अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे लक्षात येताच महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुमच्याच घरामध्ये पद वाटणार असाल तर…’ विधान परिषदेला डावलल्याने दीपक मानकर आक्रमक
-आचारसंहिता लागू झाली तरीही पुण्यात राजकीय पोस्टरबाजी कायम; कारवाईस टाळाटाळ
-आमदारकी हुकली पण, पुन्हा एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद; चाकणकरांना लागली लॉटरी
-Chinchwad: जगताप कुटुंबाला स्वकियांकडूनच विरोध; विरोधी उमेदवार होणार फायदा?
-‘महाविकास आघाडीची २१८ जागांवर एकवाक्यता’ पण हडपसरचं काय? अमोल कोल्हे म्हणाले…