पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला. हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीतील निष्ठावंत आणि संभाव्य तीन बड्या नेत्यांनी नाराडी दाखवत दांडी मारल्याचे पहायला मिळाले. नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळेंकडून करण्यात आला. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही सुप्रिया सुळे यांच्याकडे एक विनंती केली आहे.
“आम्ही कधी द्वेष करत नाही. आपण आलो आहे, सगळे एकत्र काम करू. माझी सुप्रियाताई (Supriya Sule) तुम्हाला विनंती आहे, तुमच्या लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं. त्यामुळे आम्हाला काही अडचण येणार नाही. शेवटी आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. आमचं दुखणं वेगळं होतं. ते आता बाजूला गेलं आहे. त्यामुळे आता कसलाही त्रास कुणालाही होणार नाही,”, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीतील लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं, असं हर्षवर्धन पाटील ( Harshavardhan Patil ) यांनी सुप्रिया सुळे यांना म्हणत एकप्रकारे नाराज नेत्यांची मनधरणी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का? की या नाराजीचा राष्ट्रवादीला येत्या विधानसभेत मोठा बसतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होताच जयंत पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
-अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत! कोणत्या मतदारसंघाकडे वळवला मोर्चा?
-वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’
-जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश