पुणे : महाराष्ट्र राज्य सरकार जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांच्या सबलीकरण, सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना राबवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर या योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी आल्यामुळे या योजनेच्या अटी व शर्तींमध्ये अनेकदा बदल करण्यात आले. त्यानंतर या योजनेवरुन विरोधकांनी देखील चांगलीच टीका केल्याचे पहायला मिळाले. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली असून याचा मुख्य उद्देश फक्त मतं मिळवणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी जन सन्मान रॅली आयोजित केली होती. लोकसभा निवडणुकी मिळालेल्या पराभव आणि विधान परिषदेमध्ये मारलेल्या बाजीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी बारामतीकरांशी थेट संवाद साधला. यावेळी बारामतीकरांशी बोलताना अजित पवार असे काही बालून गेले की त्यावरुन आता अजित पवारांना विधानसभा निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यातील महिलांना प्रति महिना १५०० रुपये देणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये सातत्य टिकवायचे असेल तर पुन्हा एकदा महायुतीलाच निवडून द्यावे लागेल, नाही तर ही योजना पुढे चालणार नाही, असे अजित पवार बारामतीमधील सभेत म्हणाले आहेत. यावरुन अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार केल्याचे दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना
-पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरस पसरतोय, डेंग्यूची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश