पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. महायुतीतील भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच तब्बल १६ नेत्यांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.
पुण्यातील हडपसरमधून चेतन तुपे, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उमेदवारी यादी जाहीर होण्याआधीच अजित पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यावर कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप होता. त्यातच भाजपने वडगाव शेरी मतदारसंघावर दावाही केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेतील अशी शंका असणारे सुनील टिंगरे यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. मात्र, आज अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आले.
हडपसर मतदारसंघातून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना एबी फॉर्म मिळाल्याने त्यांची देखील उमेदवारी निश्चित झाली आहे. हडपसर मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला होता. शिंदे सेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मतदारसंघातील शिंदेंचे सैनिक आणि नागरिक सकाळी ‘वर्षा’ बंगल्याच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे आता महायुतीतील इच्छुकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: अजितदादांचं ठरलं! येत्या २८ तारखेला कन्हेरीत फुटणार प्रचाराचा नारळ
-भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर
-वडगाव शेरी भाजपकडे जाणार? सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली, देवगिरीवर घेतली अजितदादांची भेट
-उमेदवारी जाहीर होताच महेश लांडगेंनी २ माजी महापौरांसोबत ठोकला शड्डू
-चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर; म्हणाले, ‘आमच्यात उमेदवारीवरुन वाद नव्हता’