पुणे : चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाना काटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. नाना काटेंच्या बंडखोरीचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाला नक्कीच बसणार आहे. नाना काटेंची बंडखोरी पाहता स्वत: अजित पवार त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले आहेत. नाना काटे आणि अजित पवार यांच्याच बराच वेळ बैठक झाली.
महायुतीतील मित्रपक्षातील भाजपकडून शंकर जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल कलाटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अजित पवारांनी काढलेल्या समजूतीनंतर आता नाना काटे आपलं बंड मागं घेणार की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप या भाजपच्या असल्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी उमेदवारी मिळण्यासाठी नाना काटे यांनी खूप प्रयत्न केले होते. मात्र, शरद पवारांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाना काटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काटेंच्या बंडखोरीने महायुतीला बसणाऱ्या फटक्याचा विचार करत अजित पवारा काटेंचं बंड शमवण्याचे प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“…त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”; विजय शिवतारेंचा अजितदादांना सवाल
-लोकसभेला रान उठवलं, पण आता अजितदादा घेणार बदला? पुरंदरच्या मैदानात शिवतारेंविरोधात उतरवला उमेदवार
-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली परंपरा; आबा बागुलांकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान
-अपक्ष उमेदवारी तरीही रॅलीची सुरवात काँग्रेस भवनातूनच; बागुलांच्या रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद
-Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..