पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजकारणातील सर्वात मोठा हॉट मतदारसंघ म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. मग तो विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा बारामतीची निवडणूक नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे बारामतीच्या राजकारणातच वेगळा रंग आल्याचे पहायला मिळते.
महायुतीत भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून उमेदवार निश्चितीबाबत लगबग सुरु झाली. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या २८ तारखेला प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
बारामतीमधील काटेवाडीजवळ असणाऱ्या कन्हेरीच्या मारुती मंदिरात येत्या २८ तारखेला दुपारी ३ वाजता अजित पवार हे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. याच दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमधून लढणार की शिरुरमधून याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अजित पवारांकडूनही बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिले जात होते. त्यानंतर मात्र, अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून येत्या २८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच दुपारी कन्हेरीच्या मारुतीरायाच्या मंदिरात दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर
-वडगाव शेरी भाजपकडे जाणार? सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली, देवगिरीवर घेतली अजितदादांची भेट
-उमेदवारी जाहीर होताच महेश लांडगेंनी २ माजी महापौरांसोबत ठोकला शड्डू
-चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर; म्हणाले, ‘आमच्यात उमेदवारीवरुन वाद नव्हता’