पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी रान उठवलं आणि परत माघारी घेतली होती. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही पुन्हा धक्का बसला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविरोधा विजय शिवतारे (Vijay Shivtare) लढण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांविरोधात रान उठवलं अन् काही दिवसातच माघार घेतली. तेव्हा शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट झाल्याचं दिसलं. मात्र, आता या विधानसभा निवडणुकीत शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात असून ते पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदरमधून विजय शिवतारेंना उमेदवारी दिली. मात्र, अजित पवारांनी शिवतारेंविरोधात मैदानात उतरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाजी झेंडे (Sambhaji Zende) यांनी पुरंदर विधानसभेतून शिवतारे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यातच शिवतारे आणि झेंडे यापैकी एकाने पण माघार घेतली नाही तर या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणार आहे.
‘मला पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता माघारीचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या पद्धतीने लढेन, ते त्यांच्या पद्धतीने लढतील. मात्र, यामधून महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नसून ते त्यांच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढणार आहे’ असं संभाजी झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. यावरुन आता मतदारसंघात नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली परंपरा; आबा बागुलांकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान
-अपक्ष उमेदवारी तरीही रॅलीची सुरवात काँग्रेस भवनातूनच; बागुलांच्या रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद
-Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..
-‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा
-‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’