पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांकडून जाहीरनामे प्रसिध्द केले जात आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. याजाहीरनाम्यात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अजितदादांनी मोठा वादा केला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये असे करुन ७५०० हजार रुपये मिळाले आहेत. आता या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या या हफ्त्यामध्ये वाढ झाली असून आता महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहिना २१०० रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
“महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या ४ महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांचे काम मांडलेले असेल”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे म्हणाले आहेत.
“आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला २५ लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. ९८६१७१७१७१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही २१०० रुपये करणार आहोत. २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे”, अशी मोठी घोषणा सुनील तटकरेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘विकास पाहिजे तर आबाच पाहीजे’ म्हणत आबा बागुलांच्या विकास यात्रेने पर्वती दुमदुमली
-‘दस में बस’ला पुणेकरांची पसंती; हेमंत रासनेंचा दावा
-“देवा भाऊ, दाढी भाऊ, जॅकेट भाऊ अन् जाऊ तिकडं खाऊ”; ठाकरेंची तोफ धडाडली
-‘पुढच्या तयारीसाठी सर्वांना संधी द्यावी’; नातवासाठी आजोबांचा मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका