पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र नाकाबंदी आहे. अनेक संशयित गाड्यांची तपासणी सुरु आहे. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये या उद्देशाने प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच आज पुण्यात एका गाडीत तब्बल १३८ कोटी रुपये किमतीचे सोने सापडले आहे. आज सकाळी सातारा रस्त्यावर नाकाबंदी सुरु होती. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला. १३८ कोटी रुपये किमतीचे सोने असणारा हा टेम्पो सहकारनगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं. याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी या संदर्भात सर्व माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो नेण्यात आलेला आहे.
या टेम्पोमध्ये एवढं सोनं नेमकं आलं कुठून आणि हा टेम्पो कुठे जात होता? कोणाचं होतं? याचा तपास आता पोलीस करत आहे. तसेच याबाबतची माहिती निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात खेड-शिवापूर येथे ५ कोटी रुपयांची रोकड नेणारी चारचाकी गाडी पकडण्यात आली होती. त्यानंतर आता हा सोन्याने भरलेला टेम्पो सापडल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हडपसरमध्ये बाबरांचं बंडाचं निशाण; म्हणाले, “ज्यांना आपलं देणं घेणं नाही, त्यांचं मलाही…”