पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या १८-१९ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला असल्याचे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
अजित पवार गटाच्या १८ ते १९ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला आहे. मात्र, शरद पवार हे साधारण १० ते १२ आमदारांनाच पक्षात पुन्हा सामील करुन घेतील. अजित पवार भाजपसोबत राहिले, तर त्यांना २० ते २२ जागा दिल्या जातील. आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील, पण निवडून मात्र कोणीच येणार नाही”, असे रोहित पवार म्हणाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांनी अजित पवार गटाबाबत केलेल्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की, भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं. अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय. अजित दादांना वेगळं करायचं. सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं. पाडण्यासाठी उभं करायचं. शरद पवारांचा पक्ष आहे, त्यांची मतं खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत, त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे”, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?
-‘हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा…’; बाबा आढावांचा राज्य सरकारला इशारा
-पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
-‘अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरच्या जागेचा….’- हर्षवर्धन पाटील
-‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना