पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरु असून महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षासाठी ती जागा सोडायची, असा महायुतीचा साधा फॉर्म्युला ठरलेला असून भाजपचा आमदार असणाऱ्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला आहे. यामुळे महायुतीत वाद होण्याची चिन्हे आहेत.
जागा वाटपात कोणाला कोणती जागा सुटणार हे अद्याप असप्ट झालेलं नाही. महायुतीतील मित्र पक्षांत असलेल्या इच्छुकांकडून मतदारसंघावर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यातच खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे असताना शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासल्यातून निवडणूक लढवण्याचा निश्चिय केला आहे. याबद्दल ‘महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि शिंदे गटाला ही जागा सोडावी, अशी मागणी कोंडे यांनी केली आहे.
दरम्यान, खडकावासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील दावा केला आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ऐन विधानसभेच्या तोंडावर या मतदारसंघात महायुतीतील नेत्यांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘दूधवाला पण लवकर उठतो’, अजितदादांचं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-‘…आता ‘ते’ तुमच्या हातात’; विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांची बारामतीकरांना भावनिक साद
-शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा दबदबा अन् नावाची दहशत; आंदेकरांचा इतिहास काय?
-सुनील शेळकेंनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी; गडकरी म्हणाले, ‘तुमचं काम झालंच म्हणून समजा