पुणे : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय बदल घडवू पाहणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये भाग घेण्याचे ठरवले होते. या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर तशी वातावरण निर्मिती देखील केली होती. मात्र ऐनवेळी जरांगे पाटलांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. यावरुन आता सामाजिक कार्यकर्ते, ऍड. असिम सरोदे यांनी बारामतीमध्ये ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या सभेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मी जरांगेंशी बोललो, माझे भाग्य त्यांनी आपलं ऐकलं आणि निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला”, असे ऍड. असीम सरोदे यांनी म्हणाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या सांगण्यावरुन सरोदेंनी जरांगे पाटलांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितल्याचा मोठा गौप्यस्फोट सरोदेंनी केला आहे.
”शरद पवार माझ्या ऑफिसला आले होते, मी जरांगेबाबत त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मी उद्धव ठाकरेंनाही सांगितले तेही म्हणाले तुम्ही बोलून घ्या. आम्हाला वाटलं आम्ही लोकसभेला इतक्या सभा घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीला हे काय सुरू झालं”, असे ऍड. असीम सरोदे म्हणाले आहेत.
“जर मराठा समाजाच्या नावाखाली इतके लोक उभे राहत असतील तर मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला होईल म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. ते म्हणाले आपल्याला निवांत बोलायचं असेल तर या सर्वांना भेटून मी घालवतो, मग आपण बोलू. रात्री ११.३० वाजता आमची बैठक सुरू झाली. ३ वाजेपर्यंत विविध विषयांवर आमची चर्चा झाली”, असेही सरोदेंनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-मतदान करूया अन् एक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडूया; सनी निम्हण यांचं आवाहन
-“कसब्यात राष्ट्रीय खेळाडू घडावे, क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी”- हेमंत रासने
-‘पर्वती फर्स्ट’मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट; पर्वतीच्या विकासासाठी आबा बागुलांचं व्हिजन
-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?