पुणे : विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून अनेक मतदारसंघातून उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. तर काही मतदारसंघात अद्याप उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली नाहीत. महाविकास आघाडीकडून खडकवासला आणि पर्वतीचा उमेदवार ठरला आहे. खडकवासला मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन दोडके यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे.
महाविकास आघाडीने पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सचिन दोडके यांनी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला आहे. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात मागील निवडणुकीत दोडकेंचा पराभव झाला होता.
पर्वती मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागुल यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी मतदारसंघातून तयारी देखील केली आहे. आबा बागुल यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांची अनेदा भेटही घेतली होती. मात्र, आघाडीकडून मतदारसंघ कोणाकडे जाणार यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. त्यामुळे आबा बागुल यांनी आधीच काँग्रेस, अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून असे ३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, पर्वती मतदारसंघात आता महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यात लढत होणार आहे. मात्र, आता आबा बागुल यांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत चेतन तुपेंच्या उमेदवारीने हडपसरचं राजकारण तापलं; महाविकास आघाडीचं काय?
-पुण्यात ठाकरेसेनेला दुय्यम स्थान, निष्ठावंतांमध्ये नाराजीची लाट; हडपसर अन् कसब्यात बसणार फटका
-चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक
-विधानसभा निवडणूक: मावळमध्ये १७ लाखांची रोकड जप्त; इतका पैसा येतोय कुठून?
-बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ‘𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान’, अभंग Repost’चे आयोजन