पुणे : भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. या चर्चेला आता अश्विनी जगताप यांनी पूर्णविराम दिला आहे. अश्विनी जगताप यांनी भाजपमध्येच राहणार असून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्या आज पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. माझ्या विरोधात कुणीतरी चुकीच्या बातम्या पसरवत आहे. मी शरद पवार यांना भेटलेले नाही. त्यांच्या पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी निष्ठा काय असते हे आजारपणात दाखवून दिलेले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडणार या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल मी त्याचं काम करेल, असे स्पष्ट अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत.
अनेक जण आम्हाला सोडून जात असले तरी आमच्यात कुठलीही गटबाजी नाही. निष्ठावंत कार्यकर्ता आमच्या सोबत आहेत. नाना काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं असलं तरी पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेईल. काटे यांचं आव्हान असेल असे मला वाटत नाही, असेही अश्विनी जगताप यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे मेट्रोची रेकॉर्ड ब्रेक कमाई; एका दिवसात साडे ३ लाख गणेशभक्तांनी केला प्रवास
-पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक; कोणत्या २ बड्या नेत्यांना घेणार सोबत?
-महाविकास आघाडीत कोथरुडची जागा ठाकरेंकडेच; इच्छुकांपैकी कोणत्या शिलेदाराला मिळणार संधी?
-छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ फुटी अश्वारूढ पुतळा; ‘शिवतांडव’चे सादरीकरण ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
-शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?