पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका बाजूला जेष्ठ नेते शरद पवार तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दोन गट तयार झाले. ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस या पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये वाद सुरु होता. यावर आता निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात खऱ्या अर्थाने फूट पडल्याचे पहायला मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना गेल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांना यंदाची लोकसभा निवडणूक वेगळ्या चिन्ह आणि नावावर लढवावी लागणार आहे. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांच्या गटात गेले आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. मात्र शिरुरचे आमदार असलेल्या अशोक बापू पवार हे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेणारे एकमेव ठरले आहेत. अशोक पवार यांच्या रूपाने शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांकडे एकमेव हुकमी एक्का असल्याचं बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुंडाने गुंडाचा काटा काढला हे खरं आहे की नाही? मोहोळ हत्याकाडांवर अजितदादांचं वक्तव्य
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान