पुणे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुन अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केले आहे. त्यातच भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी शेलार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘भाजपकडून ईडीचा त्रास दिला जातो, त्यामुळे कोरी पाटी असलेला अध्यक्ष द्यायचा या विचाराने काँग्रेसने अध्यक्ष निवडला. ज्यांची पाटी कोरी आहे, ते आमच्या पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांशी काय लढणार? कोणाला अध्यक्ष करायचे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र मी गणिताचा विद्यार्थी असल्याने ‘शून्य गुणिले शून्य इज इक्वल टू शून्य हेच उत्तर येते’ हे मला माहीत आहे. त्यामुळे अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच आहे’, असे म्हणत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
“विधानसभेचे जागा वाटप सुरू असतानाच मी महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आल्याचे स्पष्ट केले होते. ते आता खरे ठरत आहे. दुसऱ्या पक्षात कोणी प्रवेश केला की लगेचच त्याला ब्लॅकमेलिंग केले असे म्हटले जाते. मात्र उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातील काही लोकांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला, त्यावेळी आम्ही अशीच टीका केली होती का? त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते असे बोलत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे काहीही नाराज वगैरे नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री एकमताने, परस्परांशी चर्चा करून निर्णय घेत आहेत. त्यामुळे शिंदेच काय कोणीही नाराज नाही. सगळे काही अलबेलं आहे, सगळे व्यवस्थित काम करत आहेत, मी तुमच्यासमोर उभा आहे”, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जास्तीच्या निधीसाठी भाजपच्या आमदारांची जोरदार फिल्डींग! पालिका आयुक्तांकडून कोणाला झुकतं माप?
-जानेवारी महिन्यात पुणेकरांचा सुखकर प्रवास, पीएमपी अपघातांना ब्रेक; नेमका कसा घडतोय बदल?
-आमदारांना हवाय पालिकेचा कोट्यवधींचा निधी; वार्षिक अंदाजपत्रकात सुरु घुसखोरी!
-कपल्सचे चाळे अन् कॅफेच्या नावाखाली सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी खाकी दाखवताच…
-वराती मागून घोडे: ‘जीबीएस’ उद्रेकानंतर राज्य सरकारला आली जाग! शुद्ध पाण्याबाबत उचललं मोठं पाऊल