पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नवी पेठ, गांजवे चौकातील एका अभ्यासिकामध्ये शनिवारी (ता. १९) सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. बराच वेळ अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, आगीचे लोट मोठे असल्याने बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आली. मात्र, यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.
सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे खिडकीच्या काचा आणि इतर काचेच्या वस्तू फुटल्या आहेत. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले असून या आगीमुळे कोणाच्याही जिवीताला हानी पोहचली नाही. या आगीमध्ये अभ्यासिकेतील फर्निचर, पुस्तके, लॅपटॉप आणि विद्यार्थ्यांची महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. विद्यार्थ्यांची कागदपत्रे जळाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दल आणि पोलीस तपासात आगीचे कारण समोर येईल. मात्र, विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या कागदपत्रांचे तसेच नोट्सचे नुकसान झाले आहे. त्याबाबत प्रशासनाशी चर्चा करु असे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या शिलेदाराचा ठाकरे सेनेत प्रवेश; चिंचवड विधानसभेचं गणित बदलणार?
-कसब्यात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, महिला नेत्याचा लढण्याचा नारा; धंगेकरांना डोकेदुखी
-भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?
-राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!
-Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?