सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आले आहेत. आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठुरायाची आणि त्याच्या भक्तांची भेट होणार आहे. सर्व वारकरी आज चंद्रभागेमध्ये स्नान करुन विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबिरांची पालखी येते. आजच्या या आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
प्रत्येक महिन्यात एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी असते. महिन्यात एकादशी दोनदा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी असे म्हणतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.
आषाढी एकदशीचे महत्व
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू ४ महिने क्षीरसागरात (एक वैश्विक महासागर) शेषनागावर झोपी जातात. भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा ४ महिन्यांचा काळ चतुर्मास म्हणूनही ओळखला जातो. हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.
धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकदशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो. या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…
-विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा; बीव्हीजीचे ४०० स्वच्छता दूत सज्ज
-ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या
-एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट