पुणे : पुण्याला विद्येच्या माहेरघर म्हटलं जातं. याच पुणे शहरात रोज एखादी भयानक घटना घडत आहे. कधी कोयता गॅग भर गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या दहशद माजवताना दिसते. तर कधी सर्वसामान्य नागरिक गोळीबार करत आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून वाद घालत लोक एकमेकांच्या जीव घेत आहेत. आता आणखी एक घटना समोर आली आहे.
पुण्यातील एक सोसायटीत किरकोळ वादातून एका तरुणाने सांगितल्या प्रमाणे तक्रार दाखल केली नाही म्हणून वाघोली पोलीस चौकीतच स्वतःला पेटवून घेतले आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली आहे. घटना घडल्यानंतर तरुणाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तरुणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.
रोहिदास अशोक जाधव (वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास अशोक जाधव हा राहणार वाघोलीमधील आहे. सिद्धी अपार्टमेंट या सोसायटी मध्ये राहतो. त्याचे आणि सोसायटीतील लोकांसोबत सातत्याने वाद होत होते.
दरम्यान, आज सोसायटीच्या वादातून रोहिदासला बेदम मारहाण झाली. या मारहाणी विरोधात रोहिदास तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात राडा घातला आणि पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले.
महत्वाच्या बातम्या-
-मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद!
-लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार
-लोकसभा निवडणुकीसाठी मनसे जय्यत तयारी; राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर
-वृक्षरोपणाला जागा नाही तरीही पुणे महापालिका लावणार ५ कोटी रुपयांची झाडे
-कोणाच्या घशात जाण्याअगोदर खडकवासल्याच्या ऑक्सिजन पार्कचं काम सुरु- चंद्रकांत पाटील