पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करत आहे. एकमेकांवर टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. त्यातच सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मागच्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता.
विजय शिवतारे यांच्या दंड थोपटण्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवतारे हे महायुतीत असतानाही महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढणार होते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील वाद नरमला आहे. शिवतारेंचं बंड निवळताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलंच डिवचलं आहे.
एक अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्या
ओ ऽऽऽमोठ्ठया ताई…. @supriya_sule
आगे आगे देखिए होता है क्या 😀@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/zZGcAGzWPb
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) March 28, 2024
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत “एक अकेला फडणवीस क्या करेगा? ओ ऽऽऽमोठ्ठया ताई…. (सुप्रिया सुळे) आगे आगे देखिए होता है क्या” असे कॅप्शन लिहून खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलाच टोला लगावला आहे. यावर आता सुप्रिया सुळे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!
-Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले
-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा