पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत माजी मंत्री आणि इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील यांनी ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
‘विधानसभेला इंदापूरचा महाधनुष्य हर्षवर्धनभाऊ यांनी हाती घ्यावा. आम्हाला महाविकास आघाडीत अशी उमेदवारी जाहीर करता येत नाही. पण हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी आम्ही देणार आहोत. तुम्ही इंदापूरकर हुशार आहात. मी वाळव्यावरून येथे तुम्हाला येऊन सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्यी गरज त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे महत्त्व आमच्या पक्षात आहे’, असे म्हणत जयंत पाटीलांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्याचे जाहीरपणे सांगितले आहे.
‘लोकसभा निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांना फोन केला होता. आम्ही त्यांना सांगितले लोकसभेत मदत करा. ते म्हणाले आम्ही त्या पक्षात आहोत. पण शक्य असेल ते आम्ही करू. काही जण आता नाराज आहे. त्यांना जाऊन सांगा ही तुमची आमची लढाई नाही. ही शरद पवारांची दिल्लीश्वरांशी लढाई आहे. त्यांना वाटते शरद पवारांना मोडले तर महाराष्ट्र मोडता येईल म्हणून महाराष्ट्र मोडण्याचा प्रयत्न ते 10 वर्ष करतायेत. त्यामुळे आपल्याला एकएक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे शरद पवारांच्यासोबत राहा’, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत! कोणत्या मतदारसंघाकडे वळवला मोर्चा?
-वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’
-जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश
-‘…तर आबा बागुल कधीच मंत्री झाले असते! पण आता आम्ही प्रयत्न करतोय’- थोरात