पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचा प्रश्न आता आणखी गंभीर होत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली त्यामध्ये या जिल्ह्याच्या ग्रामीम भागातील ४९ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबविली होती. या मोहिमेमध्ये अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जाहीर केली आहे.
आरटीई कायद्यातील कलम १० नुसार शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता, ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा सुरू करता येत नाही. शासन, स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय शाळा चालवण्यात येत असल्यास किंवा शाळेची मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालवण्यात येत असल्यास संबंधितांना १ लाख रुपयांपर्यंत दंड, त्यानंतरही शाळा अनधिकृतरित्या सुरू राहिल्यास दररोज १० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत शाळांची यादी-
किड्जी स्कूल दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटीचे अभंग शिशू विकास कासुर्डी, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल उंड्री, नारायण ई टेक्नो स्कूल वाघोली, द गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल हवेली, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल मांजरी बु., इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, व्हीटीईएल इंग्लिश मीडियम स्कूल भेकराईनगर, द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, रामदास सिटी स्कूल रामदरा, मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, श्रीमती सुलोचनाबाई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल जांभुळवाडी,
भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई, जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल गहुंजे, व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव, किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा, रुडिमेन्ट इंटरनॅशनल स्कूल माण, एंजल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे, चाणक्य कनिष्ठ महाविद्यालय पिरंगुट, महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल खुबवली, अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल मुळशी, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट, ईलाइट इंटरनॅशनल स्कूल मुळशी, संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम मुळशी,
श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल घोटावडे फाटा, पोदार इंटरनॅशनल स्कूल ताथवडे, एलप्रो इंटरनॅशनल स्कूल हिंजवडी, माऊंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे, सरस्वती विद्या मंदिर पिरंगुट, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर,
तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब कोंढवा, लेगसी हायस्कूल कोंढवा, इमॅन्युअल पब्लिक स्कूल हडपसर, पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट पिंपळे निलख, श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे निलख, आयडियल इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव, सपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर, नवजित विद्यालय वाल्हेकरवाडी, किड्सजी स्कूल पिंपळे सौदागर, एम. एस. स्कूल फॉर किड्स सांगवी, क्रिस्टल मॉर्डन स्कूल चऱ्होली, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल चिंचवड.
महत्वाच्या बातम्या-
-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ
-पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’
-हातात पिस्तूल अन् शेतकऱ्यांवर दादागिरी; पूजा खेडकरांच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल