पुणे : शहरात कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामधून अनेक धक्कादायक खुलासे होत असतानाच या प्रकरणामध्ये राजकीय हात असल्याच्या देखील चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव या प्रकरणामध्ये वारंवार घेण्यात येत आहे. त्यातच आता अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केल्याचे फोन कॉल लॉग तपासातून उघड झाले आहे.
रविवारी १९ मे रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अग्रवाल आणि टिंगरे यांच्यात एकूण ४५ मिस्डकॉल्स होते. अपघात झाल्यानंतर विशाल अग्रवाल यांनी आमदार टिंगरे यांना फोन केला होता. आमदार टिंगरे झोपेत असल्याने त्यांनी सुरुवातीला फोन उचलला नाही. पहाटे ३.४५ वाजेपर्यंत विशाल अग्रवाल यांनी टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला आहे. परंतु, ४६ व्या कॉलला आमदार टिंगरेंनी उत्तर दिले असल्याचे समोर आले आहे.
अपघात झाला त्या दिवशी सकाळी ६ वाजता सुनील टिंगरे हे येरवडा पोलीस ठाण्यात विशाल अग्रवाल यांच्या मदतीसाठी पोहोचले होते. येरवडा पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून आमदार टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे समोर आले आहे.
विशाल अगरवाल हे आमदार टिंगरे यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. तसंच, ही घटना त्यांच्याच मतदारसंघात घडली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती, असं सुनील टिंगरे यांनीही स्पष्ट केले होते. मात्र टिंगरे यांच्याभोवती वारंवार संशयाचे जाळे फिरत असल्याने मतदारसंघात रोष व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर नेमकं कारण काय? म्हणाले….
-आरोपींना वाचवण्यासाठी नको ते उपद्वाप; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मध्यरात्री गाडीतून कोणाला आणलं?
-स्वा. सावरकरांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बारमध्ये कठोर नियम लागू; रात्री किती वाजेपर्यंत सुरु राहणार?
-तुमची मुले मोबाईलमध्ये अडल्ट Video पाहतात का? मग आजच मोबाईचे ‘हे’ सेटिंग्ज चेंज करा