पुणे : पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या कुत्र्यांचा सर्वसामान्य नागरिक आणि पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ महिन्यांमध्ये तब्बल १८ हजारांपेक्षा जास्त पुणेकरांना हे भटके कुत्रे चावले आहेत. २०२३ मध्ये जानेवारी ते ऑगस्टमध्ये तब्बल १४ हजार ७३ हजार नागरिकांना कुत्रे चावले होते. मात्र आता यात वाढ झाली असून ही आकडेवारी धक्कादायक आहे.
महापालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता पुणेकरांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच ९ महिन्यात नागरिकांना चावलेल्या कुत्र्यांची आकडेवारी समोर आल्यानंतर आता शहरातील गल्ल्यांमधून, पादचारी मार्गावरुन जात असताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे दिसत आहे.
महापालिका प्रशासन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार? असा सवाल विचारला असता पालिकेकडून याला प्रत्यतर देण्यात आले आहे. या भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात येत असल्याचा दावा आता पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने केला आहे. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुत्रा चावल्यानंतर रेबिजची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधनात्मक उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या भटक्या कुत्र्यांना पुणेकर चांगलेच वैतागले आहेत.
जानेवारी ते ऑगस्टपर्यंत किती पुणेकरांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा?
जानेवारी : १९७३
फेब्रुवारी : २०९३
मार्च : १९६१
एप्रिल : १९२०
मे : २८३९
जून : २१९९
जुलै : २०१२
ऑगस्ट : १९३७
सप्टेंबर : २०२६
पुण्यातील भटक्या कुत्र्यांनी तब्बल १४ हजार ७३ पुणेकरांना चावा घेतला असून या प्रकरणावरुन नागरिकांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘वेळ पडल्यास स्वबळावर लढणार’; शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात
-लोकसभा, विधानसभा झाली तरीही पवार विरुद्ध पवार सामना सुरुच; बारामतीत नेमकं काय घडतंय?
-पुण्यात १४ ते २२ डिसेंबर पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन