पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी जाऊन पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अतुल बेनके हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार असल्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आज अतुल बेनके यांच्या भेटीवरुन देखील अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अतुल बेनके आणि शरद पवार यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला असता सूचक वक्तव्य केली आहेत.
‘अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. तसेच अतुल बेनके देखील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी काहीही होऊ शकतं. कदाचित अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील.’ बेनके आणि पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून अतुल बेनके आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बेनके शरद पवारांसोबत गेले तर अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”
-अजित पवारांच्या गुलाबी कोटवरुन अमोल कोल्हेंचा खोचक टोला म्हणाले, ‘त्यामागचा हेतू राज्याचं…’
-पूजा खेडकरांची जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात छळाची तक्रार; सुहास दिवसे म्हणाले,…