पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोसरीनंतर आता चिंचवड मतदारसंघातून देखील मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. ‘माझ्यावर तीस वर्षे सातत्याने अन्याय झाला’, असं सांगत अजित पवार गटाला रामराम ठोकला आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या जाण्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
पक्ष सोडताच भाऊसाहेब भोईर यांनी अजित पवारांवर टीकात्मक भाष्य करायला सुरवात केली आहे. ‘अजित पवार यांनी चिंचवड शहरात सरड्यांचे डायनोसर केले, भ्रष्टाचाराची एक पिढी तयार केली, अजितदादा विकासाच्या दृष्टीने बघत असले तरीही याठिकाणी शहराची पूर्ण वाट लागली आहे. मुळात त्यांना हे समजलंच नाही की हे खरंच लायक आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत भोईरांनी अजित पवारांवर जहरी टीका देखील केली आहे.
दरम्यान, चिंचवडची जागा भाजपला सुटणार असल्याचं समजताच भोईरांनी भाजपची वाट धरली. चिंचवडमधून माजी नगरसेवक नाना काटे देखील भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच दुसऱ्या बाजूला १५ माजी नगरसेवकांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकण्याची तयारी आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अजित पवारांचं टेंशन वाढलं असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नितीन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; वडगाव शेरीबाबत काय होणार निर्णय?
-वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम
-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला
-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….