पुणे : पुणे पोलिसांनी शहरात धडक कारवाया करत अनेक भागातून ड्रग्ज जप्त केले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४४ किलो ७९० ग्रॅम किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणी २ पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक केली. शेळके याच्याकडे तब्बल ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोन सापडले. यावरुन त्यांच्यावर कारवाई करत पोलीस दलातील २ पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ तर एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
विकास शेळके या प्रकरणी चौकशी सुरु होती. यात धक्कादायक बाब म्हणजे विकासकडे आणखी २ किलो ड्रग्ज सापडले आहेत. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या विकास शेळके याने झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्स लंपास करण्याचा प्रयत्न केला. विकास शेळके याच्याकडून मेफेड्रोन नावाचे ड्रग्स जप्त केले गेले. त्यानंतर आता पोलीस चौकशीतून आणखी २ कोटींचे ड्रग्स त्याच्या मोटारीतून जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी विकास शेळके कार्यरत होता. प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. त्याच्याकडील ४४ कोटी ७९ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर विकास शेळके याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपल्या मोटारीत आणखी ड्रग्स असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोटारीतील ड्रग्स जप्त केले. दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स हे होते. त्याची किंमत २ कोटी रूपये आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले
-‘गद्दारांचा पराभव करुन मीच सेनेचा खासदार’; मावळमध्ये ठाकरे गटाच्या वाघेरेंची प्रचाराला सुरवात
-कसब्यात “होय हे आम्ही केलं”चा पॅटर्न; निवडणूक लोकसभेची पण कसब्यात चर्चा ‘पोस्टर वॉर’ची