पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि खासदार शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी अजित पवारसोबत सध्या असलेले काही आमदार इतर पक्षाच जाणार असल्याचे भाकीत केलं होतं. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधी सुरु केला. काही माहिती नाही पण आपण ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला, त्यातील २ तरी आमदारांची नावं जाहीर करावी’, असं थेट आव्हान सुनिल शेळके यांनी रोहित पवारांना दिला आहे.
अजितदादांसोबत असलेले काही आमदार इतर पक्षात जाणार असल्याचे भाकीत आ. रोहित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांनी चांगलाच समाचार घेतला. रोहित पवारांनी ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला, त्यातील दोन तरी आमदारांची नावं जाहीर… pic.twitter.com/kHLrkBGO6f
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 6, 2024
‘आधी आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा आणि त्यानंतर राज्याचा नेता होण्याचं स्वप्न बघावं’ असा मैत्रीपूर्ण सल्लाही आ. शेळके यांनी रोहित पवारांना दिला आहे.
“राट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारखं नेतृत्व तुमच्यासोबत आहेत त्यांची तुम्हाला पक्षात अडचण होत आहे. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून आपण काय काय रणनिती आखत आहे ती थांबवा. जयंत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका. जे सोबत आहेत त्या सदस्यांना सोबत घेऊन काम करावं”, असं सुनिल शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महापालिका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल; कारवाई होण्याआधीच रोख रकमेसह फरार
-बारामतीतून लढण्यावरून सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “उमेदवार म्हणून माझंच नाव…”
-पुणे काँग्रेमध्ये “लेटर बॉम्ब”चा झटका, लोकसभा उमेदवारीवरून आबा बागुलांचा इच्छुकांना दणका
-जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा