पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या मुद्द्यावरुन राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शरद पवारांचे निवासस्थान ‘मोदी बागे’त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही उपस्थित असणार आहेत.
पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल देशमुख यांच्यासह राज्यातील अन्य नेतेमंडळी सोबत बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. जेणेकरून आपल्याला प्रचार करण्यास सुरुवात करता येईल. तसेच आम्ही कोणासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्या संदर्भात चर्चा देखील झाली नाही’, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
या बैठकीला आज पुण्यात शरद पवार यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल देशमुख यांच्यासह राज्यातील अन्य नेतेमंडळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-Big Breaking | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील या ३ नावांवर शिक्कामोर्तब
-राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन???
-२०१९ला विधानसभेत मेधा कुलकर्णींना नाकारलं आता जाणार थेट राज्यसभेत??
-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनवणी लवकरच होणार; सीबीआयचा युक्तीवाद संपला
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन