पुणे : आमदार आण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येचा शुक्रवारी विवाह समारंभ होता. या विवाह सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे. याच विवाह सोहळ्याला मावळ लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे देखील उपस्थित होते. यावेळी संजोग वाघेरे हे अजित पवारांच्या पाया पडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
संजोग वाघेरे यांनी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. यावेळी अजित पवार काही वेळ अवघडल्याचं दिसून आले आहेत. अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार लग्न समारंभात आल्याच्या अगदी काही मिनिटांनी संजोग वाघेरे पाटील हे देखील वधू-वरास आशीर्वाद देण्यास व्यासपीठावर आले. त्यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला.
संजोग वाघेरे हे काही महिन्यांपूर्वी अजित पवारांचे खंदे समर्थक होते. पण आता मात्र वाघेरे हे या निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठेकून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात गेले. २०१९ च्या मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार करताना दिसत आहेत.
अशी सर्व राजकीय पार्श्वभूमी असताना उद्धव ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याचे निवडणुकीच्या आधी आशिर्वाद घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार
-पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी; मोदींच्या विशेष पथकाकडून सभास्थळाची पाहणी
-पुणे तिथे काय उणे! नोकरीला लाथ मारत, बॉसला दिली खुन्नस; ढोला-ताशा वाजवत जल्लोषात कंपनीतून एक्झिट
-‘केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार’; सुनेत्रा पवारांचं जनतेला आवाहन