Latest Entertainment News : बॉलिवूडचे लव्हबर्ड्स अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर आता वेगळे झाले आहेत. सध्या सर्वत्र यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी कधीही उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पहिले गेले. त्याचवेळी आता त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी अनन्या आणि आदित्यच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती आणि आता पुन्हा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत स्पष्ट केले आहे. त्यांच्या एका मित्राने ते दोघे आता वेगळे झाले असल्याचे सांगितले आहे. अलीकडेच अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्याबद्दल इंटरनेटवर अशा बातम्या समोर येत आहेत.
बॉम्बे टाईम्समधील एका बातमीनुसार, जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अनन्या आणि आदित्य यांचे एक महिन्यापूर्वी ब्रेकअप झाले आहे. याची माहिती त्यांच्या जवळच्या एका मित्राने दिली आहे. दोघांच्या ब्रेकअपने आता त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या महिन्यात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात आला होता. दोघांमध्ये काही मुद्द्यावरून मतभेद होते, त्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोलत नसल्याचे सांगितले जात होते. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान, अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टही शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ‘जर ते तुमचे असेल तर तुमच्याकडे परत येईल, आणि जर ती जात असेक तर तू तुम्हाला नक्कीच एक चांगला धडा शिकवून जाईल, जर ती तुमची असेल तर ती नक्कीच परत येईल, जरी तुम्ही तिला दूर ढकलले तरीही.” अभिनेत्रीच्या या पोस्टवरून नक्कीच दोघांमध्ये काही ठीक नसल्याचे समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मतदारांसाठी मोहोळांकडून प्रभावी यंत्रणा; पुणेकरांनी घेतल्या दोन लाख ‘व्होटिंग स्लीप’
-दत्तात्रय भरणेंची मतदान केंद्रावर शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल, वाचा भरणे काय म्हणाले?
-बारामती मतदारसंघातून मतदान करताना ईव्हीएमवर ‘कमळ’ चिन्ह नाही म्हणून आजोबा आक्रमक
-‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
-Baramati | निवडणुकीत पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवार म्हणाले, मी..