पुणे : जगभर ख्याती असणाऱ्या विद्येचं माहेरघर, आयटी हब अशी ओळख असलेल्या पुणे शहरात राज्य, परराज्यातून लाखो तरुण शिक्षणासाठी येत असतात. त्यातच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील शहरात कमी नाहीये. गेल्या काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेतील एका अभ्यासिकेला भीषण आग लागली. या आगीत अनेक विद्यार्थ्याची महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप्स जळून खाक झाली. या घटनेनंतर शहरातील सर्व अभ्यासिकांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते.
महापालिकेच्या अग्नीशमन दलाने शहरातील अभ्यासिकांचे लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल देखील आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये अनेक गंभीर गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. निवासी जागेत या अभ्यासिका चालविल्या जात असून अनेक ठिकाणी सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर आता आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे पालिका आयुक्त डॉ. भोसले सांगितले आहे.
‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना सुरक्षित आणि शांततेमध्ये अभ्यास करता यावा, यासाठी महापालिकेच्या काही शाळांची जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या ७०० ते १००० विद्यार्थ्यांसाठी ही जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेचा असणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचे फी भरणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना येथे प्रवेश देण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. यासाठीचे नियोजन सुरू असून पुढील काही दिवसातच महापालिकेच्या प्रयत्नांना यश मिळेल’, असा विश्वासही आयुक्त डॉ. भोसले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचं पाऊल; जिल्ह्यात २७ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
-‘जे नेते आधी काका मला वाचवा, म्हणत होते तेच आता…’; सुनील शेळकेंचा शरद पवारांच्या नेत्यांना टोला
-‘दोन्ही नेते एकत्र आले तर ‘त्यांची’ कुचंबणा होईल’; रुपाली पाटलांचा निशाणा कोणावर?
-‘कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणाला जेलमध्ये टाकायचं हे…’; रावसाहेब दानवेंचा रोख नेमका कोणाकडे?
-फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?