Amruta Khanvilkar : मराठी सिनेसृष्टीतील दमदार अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. अमृता नेहमीच सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अमृता तिच्या वर्किंग अपडेट्स आपल्या चाहत्यांना देत असते. एवढंच नाही कर ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदी क्षणाचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायपल करते. मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. याच ट्रोलिंग बाबत आता तिने पोस्ट करुन नेटकऱ्यांवर आक्रमक झाली आहे.
अमृताने फेसबुकवर पोस्ट लिहून घाणेरड्या कमेंट्स व ट्रोलिंगबाबत अमृताने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल …. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार …. नवीन मनोकामना …. नवी स्वप्ने … देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार ….”, असं अमृता आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे…. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये …. पण यावर जे तुम्ही लिहिता… बोलता…. ह्यातून फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात.. असो.. मी नॉर्मली या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच …. पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे”, असं म्हणत अमृता नेटकऱ्यांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरेंनी मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा; त्यावर वसंत मोरे म्हणाले,….
-भाजपमध्ये प्रवेशासाठी तुम्ही दिल्लीत पिंगा घातला! अतुल बेनकेंनी घेतला अमोल कोल्हेंचा समाचार
-“महायुतीच्या विजयात भोर तालुक्याची मोलाची भूमिका”; सुनेत्रा पवार भोरच्या दौऱ्यावर
-महापालिका इन अॅक्शनमोड: शहरातील नाले, गटारे सफाई १० मे पर्यंतच करावीत, पालिका आयुक्तांच्या सूचना