पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले होते. त्यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आणि नवनीत राणा यांच्यावर टीका करणाऱ्यांना ही चांगलेच खडसावले आहे.
आता नवनीत राणा यांना मतदान करा. आम्ही जर तुमचे काम केले नाही तर आम्हाला ‘चलो जाओ’ म्हणा.२०१४च्या निवडणुकीत आम्ही नवनीत राणांना उमेदवारी दिली. २०१९ मध्ये त्यांना पाठिंबा दिला. आताही त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आगामी निवडणुकीतही तुम्ही नवनीत राणा यांनाच मतदान करा. नवनीत राणा यांच्यावर आरोप करतात, त्यांच्या घरी काय आई-बहिणी नाहीत का?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी यावेळी अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचारदरम्यान केला.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला चांगलं संविधान दिलं आहे. जोपर्यंत सुर्य, चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. सांगायला काही नाही म्हणून संविधान बदलणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसमध्ये वादाची मालिका सुरूच, बागुलांच्या विरोधात झळकवले बॅनर; धंगेकरांना डोकेदुखी
-जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज
-रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही
-निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार?; अजितदादा म्हणाले, “एकदा ७ तारखेला मतदान होऊ द्या, मग…”