पुणे : बारामती लोकसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. असे असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने शिंदे आणि अजित पवार गटात ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. यावेळी विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली. या टीकेला अजित पवारांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी आणि आनंद परांजपे यांनी उत्तर दिलं आहे.
“येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपलं डिपॉझिट वाचवून दाखवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांना चॅलेंज आहे तू अजितदादांवर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा उर्मटपणा, तुझा उन्मत्तपणा, तुझा हलकटपणा, अख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाग. आज तू बोलण्याचा कहर केलाय. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवसरेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असं म्हणत अमोल मिटकरींनी शिवतारेंचा एकेरी उल्लेख केला आहे.
“माननीय मुख्यमंत्री हे मुखदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का? हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण ‘मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्ध निवडणूक लढवणार’ अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्वरित याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे”, असं आनंद परांजपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”
-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला
-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार
-ईडीच्या १८ वर्षांतील कारवायांचा शरद पवारांनी वाचला पाढा; रोहित पवारांवर केलेल्या कारवाईवरून आक्रमक
-महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचं वक्तव्य; ‘जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालीय तिन्ही पक्ष…’