शिरुर : पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. यामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांच्यात ही मुख्य लढत झाली. देशातील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून सध्या मतमोजणी सुरू आहे.
या मतमोजणी दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीमध्ये अखेर अमोल कोल्हे 27053 मतांनी आघाडीवर आहेत तर शिवाजीराव आढळराव पाटील हे 128357 मतांनी पिछाडीवर आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे पहिल्या फेरी अखेर 9000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होते. भोसरी विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंना आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीमध्ये अखेर अमोल कोल्हे यांना 9000 मतांची आघाडी महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर होते.
महत्वाच्या बातम्या-
-मावळमध्ये बारणे का वाघेरे आघाडीवर? पहा Live कोणाला किती मते?
-सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये काटे की टक्कर? तिसऱ्या फेरी अखेर कोणाची आघाडी? पहा live
-दुसऱ्या फेरी अखेर पुण्यात मोहोळ आघाडीवर, पहा कोणाला किती मते
-पहिल्या फेरी अखेर पुण्यात काय परिस्थिती? मोहोळ की धंगेकर आघाडीवर? पहा Live निकाल
-Weed | महाराष्ट्रात गांजा विक्री सुरुच; ओडिसावरुन आला २ कोटींचा गांजा