पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. अजित पवारांनी नुकतीच जनसन्मान यात्रा सुरु केली असून यामध्ये सर्वाधिक गुलाबी रंगाचा वापर केल्याचे दिसत आहे. यावरुन शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
‘गुलाबी रंगाची पुंगी वाजवून जनतेला डोलविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ही जनता स्वाभिमानी आहे. नागाचे दात काढून पुंगी वाजवून त्याला डोलायला लावून झाले आहे. आज नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांच्या आवाज काढून जनतेचा नाग डोलतो का? हे बघण्याचा प्रयत्न सुरु आहे’, असा सणसणीत टोला कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे.
‘कधीतरी वाटायचं शेतकऱ्याचं सरकार आहे, त्यामुळे काळ्या आईच्या रंगाचं असेल. कधीतरी ऐकलं होतं, छत्रपती शिवरायांचं सरकार आहे, त्यामुळे भगवा रंग असेल. पण कोणताही रंग निवडताना गुलाबी रंग निवडला याला एक योगायोग आहे. यापूर्वी तेलंगणामध्ये निवडणूक झाली. तिथे चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा गुलाबी रंग होता, तिथे पक्षाची दाणादाण झाली’, असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनावलं आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या या गुलाबी रंगाच्या वापरावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ‘आम्ही जनतेचे रंग घेऊन निघालो आहे, जनतेच्या विश्वासातील रंग आहे. राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही आजपासून ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरु करत आहोत. महायुती सरकारने सुरु केलेला गोंधळ दाखवण्याच काम ही यात्रा करेल. आमची यात्रा संपूर्ण राज्यभरात जाणार आहे’, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त
-भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?
-राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग
-स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध