पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, खासदार शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जाणारे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधाक आज शरद पवारांनी तोफ डागली आहे. वळसे पाटलांच्याच मतदारसंघात मंचर येथे सभा घेतली. या सभेमध्ये आमदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीका, आरोपांचा समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘त्यांच्या (शरद पवार) पोटी जन्म घेतला असता तर पक्षाचे अध्यक्षपद मिळालं असतं’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिली. अनेक वार छाताडावर झेलले, त्यातील प्रत्येकजण छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळं अनेकांना वाटतं की पोटी जन्माला येणं गरजेचं आहे. अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं’, असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.
‘२०१९ मध्येही शिरूर लोकसभेत शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं. त्यावेळी मी इथून खासदार झालो. आताही शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांना आव्हान देण्यात आलं. यावेळी सुद्धा आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवणार यात शंका नाही. दिल्लीतून गुबूगुबू म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार निवडून द्यायचे की तुमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे वाघ खासदार म्हणून निवडून द्यायचे हे तुम्ही ठरवा’, असेही अमोल कोल्हे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो मिळकतकर भरायला विसरू नका, अन्यथा प्रॉपर्टी होईल जप्त
-“अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून त्यांची व्होट बँक कमी झाली”
-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त
-पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन!; पुणे पोलिसांकडून कसून चौकशी
-लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये ३ नावांची चर्चा; धंगेकरांना उमेदवारी देण्याची समर्थंकांची इच्छा