पुणे : पुणे अपघात प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात मोठा वाद उभा राहिला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आज उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्या जिजाऊ बंगल्यावर बैठकीसाठी पोहचले. अमितेश कुमार (३० मे) आज सकाळी ७ वाजता अजित पवार यांच्या ‘जिजाऊ’ बंगल्यावर पुणे शहरातील वाहतुकीसंदर्भात बैठक झाली असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.
सकाळी ७ वाजता अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याबाबत अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. बैठकीसाठी मेट्रोचे अधिकारी देखील उपस्थित होते. बैठक विशेष करून पुण्यातील वाहतूक आणि मेट्रो कामासंदर्भातील होती. अर्धा तास बैठक सुरू होती. या बैठकीला इतर अधिकारी देखील उपस्थित होते असेही अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. दरम्यान, कल्याणीनगर अपघातबाबत अजित पवारांनी काहीच विचारलेले नाही, असे स्पष्टीकरणही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी सोमवारी पोर्शेच्या दुर्घटनेनंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याची पुष्टी केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. ज्या-त्या भागातील प्रमुखांशी बोलून माहिती घेणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला फोन येतात. मी पोलीस आयुक्तांना सांगितले की, आरोपी मुलगा श्रीमंत कुटुंबातील आहे आणि पोलिसांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. मी त्यांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका असे सांगितले होते”, असे अजित पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?
-जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक; हडपसरमध्ये तीव्र आंदोलन
-‘जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर…’; सुषमा अंधारेंनी केली आव्हाडांची पाठराखण
-राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक चरणसिंह राजपूत अचणीत; होणार कारवाई?