पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या धडक मोर्चातील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला.
कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळ रोखून धरलं त्यानंतर मनसेच्या फक्त शिष्टमंडळाला आत जाऊन कुलगुरू सुरेश गोसावी आणि विद्यापीठ प्रशासनाची भेट घेता येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. विद्यापीठाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यानंतर पोलिसांनी अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना कुलगुरूंच्या कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी पाठवण्यात आलं. पुणे विद्यापीठात कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यांच्याकडून विविध घोषणा दिल्या जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते जमले. विद्यापीठ चौकात हा मोर्चा शांततेत पार पाडावा, असं आवाहन अमित ठाकरेंनी केलं.
महत्वाच्या बातम्या-
-तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार
-पुणे ड्रग्ज रॅकेट: दिल्लीत अटक केलेल्या ३ आरोपींना रात्री पुण्याला आणलं
-पुण्यात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट; सांगलीतून गोव्याला पुरवले जायचे ड्रग्ज
-नवा पक्ष, नवे चिन्ह, शरद पवार रायगडावर तुतारी वाजवत लोकसभेचे रणशिंग फुंकणार
-“हा नणंद भावजईचा कौटुंबिक कार्यक्रम नाही’; सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक सिरिअसली
दररोजच्या नवनवीन घडामोडी मिळवण्यासाठी आजच आपला व्हाट्स अप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GR5EULHUy7UHWhaCvwV111