मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे वातावरण सध्या थंडावले आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘गजानन किर्तीकर यांनी आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी’ अशी मागणी केली होती. दरेकरांच्या या मागणीवर आता एकानाथ शिंदे गटाटे आनंदराव अडसूळ यांनी उत्तर दिले आहे. अडसूळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून याचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
‘अमित शहा यांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी विनाकारण बोलू नये. अन्यथा महायुती ऐक्य नाही, असा संदेश जनतेमध्ये जाईल’, असे म्हणत आनंदराव अडसूळ यांनी दरेकरांना उत्तर दिले आहे. ‘गजानन कीर्तिकर यांचे शिवसेनेतील काम मोठे असून वडिलांनी मुलाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात काहीही गैर नाही’, असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले.
शिशिर शिंदे हा एक छोटा माणूस आहे, त्याने नीतिमत्ता सोडली आहे. आपण कोणाविषयी बोलतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ज्याने अनेक वर्ष काम केले, अशा माणसावर आरोप करताना आपण कोण आहोत? आपण किती छोटे आहोत? किंवा ती माणसे किती मोठी आहेत एवढा तरी विचार केला पाहिजे, असे म्हणत आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना खडेबोल सुनावले आहेत.
‘लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसेल’, असे वक्तव्य आनंदराव अडसूळ यांनी केले होते. अडसूळ यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे दरेकर आणि आशिष शेलार आक्रमक झाले होते. महायुतीत राहून आपल्या विरोधात बोलणे योग्य नाही. शिवसेना पक्ष भाजपसोबत आहे. उमेदवारीवेळी आपण नवनीत राणांना समर्थन दिले. आता निवडणुका झाल्यावर अशा प्रकारचे बोलणे आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. हे विकृत प्रकारचे वक्तव्य आहे, असे प्रवीण दरेकर अडसूळांच्या वक्तव्यावर म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-अक्रोड खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अक्रोडाच्या सेवनाचे उन्हाळ्यात होतो अधिक फायदा
-Pune Hit & Run: नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला घरात डांबलं, आता पोलिसांनी आजोबालाच….
-ब्रेकिंग: हिट अँड रन प्रकरणातील दिरंगाई भोवली, येरवडा पोलीस ठाण्यातील २ अधिकारी निलंबित
-विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; जूनमध्ये ‘या’ दिवशी होणार मतदान