Almond Benefits : बदाम हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे. बदामामध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात. जी मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. आजच्या पिढीला पौष्टिक पदार्थ खाण्याची गरज आहे. मात्र अनेकदा आपण बदामासारख्या पोषकतत्वे असणाऱ्या पदार्थ, फळांकडे दुर्लक्ष करतो. बदाम खाण्याचे फायदे तर अनेक आहेत. पण भिजवलेले बदाम खाल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. सध्याच्या बदलत्या काळात फास्ट फूडमुळे अनेक जण आरोग्यास फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा नाश्ता, जेवणात समावेश करत नसल्याचे दिसून येते. परिणामी अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तसेच खूप साऱ्या आरोग्याबाबतीत अनेक अडचणी उद्धभवतात. आज आपण भिजवलेले बदाम खाल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे पाहणार आहोत….
भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे
1. पचनक्रिया सुधारते
भिजवलेले बादाम खाल्याने आपली पचनक्रिया सुधारते. कारण बदाम भिजल्यानंतर त्यामधील अँटी-न्युट्रिशनल घटक (जसे की फाइटिक ऍसिड) कमी होतात. परिणामी भिजलेले बदाम पचनासाठी हलके होतात. भिजवलेले बदाम हे आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे पोहचवण्यास मदत करतात.
2. शरिरातील उर्जा वाढवते
भिजवलेल्या बदाम खाऊन आपल्या दिवसाची सुरवात केल्याने आपल्या दिवसभर आल्या शरिरात उर्जा कायम टिकून राहते. निरोगी आरोग्य, प्रथिने आणि फायबरचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. जे तुम्हाला दिवसभर उर्जा पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. भिजवलेल्या बदामांचे सेवन तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश केल्याने पोषक तत्वांमुळे तुम्ही उत्साही आणि लक्ष केंद्रित करू शकता.
3. हृदयाचे आरोग्य राखते
भिजवलेले बदाम हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हृदयाचे आरोग्य सुधारवण्यास मदत करतात. आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवतात.
4. वजन नियंत्रणास मदत
भिजवलेल्या बदामांमध्ये असलेले फॅट्स आणि प्रोटीन वजन कमी करण्यास मदत करू शकतात. हे पूर्णपणे पचायला सुलभ असतात आणि हंगर हॉर्मोन्सला संतुलित ठेवून आपले वजन नियंत्रित करतात.
5. मेंदूची कार्यक्षमता वाढवते
भिजवलेले बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. त्यात असलेल्या ओमेगा-३, फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन ई असल्यामुळे उत्तम आरोग्य राखण्यासाठी भिजवलेले बदाम हे महत्त्वपूर्ण कार्य करतात.
भिजवलेले बदाम कधी खावेत?
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज भिजवलेले बदाम खाणे आवश्यक आहे. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम दररोज सकाळी खावेत. एकावेळी किमान ८-१० भिजवलेले बदाम साल काढून खावेत. हे बदाम जास्त चवदार लागतात. तसेच त्यामधीलो पोषणतत्त्वेही अधिक प्रभावी ठरतात.