पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाटामध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास २१ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला गेली असता त्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेला ८ दिवस उलटून गेले असून आज नवव्या दिवशी या घटनेतील ३ मुख्य आरोपींना पुणे पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
३ ऑक्टोबर रोजी ही तरुणी रात्री ११ च्या सुमारास आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी बोपदेव घाटामध्ये गेली होती. हे दोघेजण गप्पा मारत बसले असताना अचानक तिथे ३ नराधम आले. तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. त्याचा शर्ट काढून पाय बांधले आणि बेल्टने पाय बांधून ठेवले होते. त्यानंतर हे नराधम त्या तरुणीला गाडीतून घेऊन गेले. तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी पीडित तरुणीला खडी मशीन चौकात सोडून या नराधमांनी तेथून पळ काढला.
तीन आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. गेल्या काही दिवसांपासून या घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या तपासाला मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या आरोपींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार हाती घड्याळ घेणार! शरद पवारांच्या आमदाराला देणार टक्कर
-डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय
-बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात; आणखी दोघांचा शोध सुरु
-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमदार माधुरी मिसाळांनी सांगितला ‘तो’ किस्सा