Akla Yagnik : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. अलका याग्निक यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. अलका याग्निक यांनी आपल्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावले मात्र, आता त्यांना एका दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना झालेल्या आजाराची त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
अलका याग्निक यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, मला ‘रेअर सेंसरिनुरल नर्व्ह हिअरिंग लॉस’ दुर्मिळ शारीरिक समस्या आहे, ज्यामुळे तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याला व्हायरल अटॅकमुळे हा त्रास झाला आहे, असे अलका याग्निक म्हणाल्या आहेत. याच पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. अलका याग्निक यांना झालेल्या या आजारामध्ये कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस डॅमेज होते.
View this post on Instagram
आजाराची कारणे
- ‘रेअर सेंसरिनुरल नर्व्ह हिअरिंग लॉस’ या आजारामुळे वाढत्या वयोमानुसार नस डॅमेज होतात.
- आपल्या डोक्याला किंवा कानाला दुखापत झाल्यामुळेही नसांचे नुकसान होते.
- काही वेळेस व्हायरल इंन्फेक्शनमुळे मेनिन्जायटिस (मेंदूवरील आवरणाला सूज आणणारा आजार), गोवर आणि मेनिएर रोग यांसारख्या रोगांनंतर नसांचे नुकसान होते.
- बराच वेळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने देखील बहिरेपणा येऊ शकतो. हा आजार होऊ शकतो.
- कानाच्या आतील पेशींना इजा पोहोचवणाऱ्या काही औषधांमुळे नसा डॅमेज होऊन बहिरेपणा येतो
महत्वाच्या बातम्या-
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालखीकडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?
-महायुतीत वाद? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नाही तर…’
-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
-अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर